दोन अज्ञात इसमांनी3 लाखांची रोकड केली लंपास
पनवेल, दि.20 (वार्ताहर)- तीन लाखांची पिशवी घेऊन गाडीकडे पायी जात असताना दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून पाठीमागून येऊन रोखरक्कम असलेली पिशवी लंपास केल्याची घटना शहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र समोरील कर्नाळा भाजी मार्केट परिसरात घडली आहे.
गोपीचंद ठाकूर (वय-54) हे त्यांच्या मित्रासोबत फोनवर बोलत त्यांनी उभी करून ठेवलेल्या गाडीकडे रोखरक्कम घेऊन पायी जात असताना दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून पाठीमागून येऊन रोखरक्कम असलेली पिशवी लंपास केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे.