- अमन पोलिक्लिनिक उरण शहर आयोजित आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद.
उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, त्यांचे जीवन सुखी, आनंदी व्हावे व आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून रविवार दिनांक 28/11/2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत तेरापंथी हॉल,अमन पॉलीक्लिनिक, यश मेडिकल जवळ,ठाकूर अपार्टमेंट, उरण शहर येथे अमन पॉलीक्लिनिक व क्वीन्स केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराअंतर्गत नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.इसीजी, बीपी, डायबेटीस, बी एम डी आदीची मोफत तपासणी या शिबिरात करण्यात आली .तर विविध रोग व त्या रोगावर उपाययोजना याबाबत मोफत मार्गदर्शन तज्ञ डॉक्टर द्वारे करण्यात आले.हेलपिंग स्टार फॉउंडेशन अंतर्गत सुरु असलेल्या अमन पॉलीक्लिनिकचे हे तिसरे वर्ष असून क्वीन्स केअर क्लिनिक यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घेतला.एकंदरीत या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.डॉ आतिफ मोहिनतूले, डॉ तारीफ सुर्वे, डॉ कनक मिश्रा,डॉ तालिब सुर्वे,डॉ नितीन जैन,डॉ जास्मिन सुर्वे, डॉ मुद्दशिर राऊत, सामाजिक कार्यकर्ते अब्रार शिलोत्री,संतोष पवार, अखलाख शिलोत्री, मिलिंद पाडगावकर, आयजास मुकादम, हनिफ भाटकर, अलीम भाईजी,अफशा मुकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.