उरण तालुका लेदर क्रिकेट असोसिएशन आयोजित उरण प्रीमियर लीग 2021 चे विजेते डी पी लायन्स तर उपविजेता जय मल्हार वरियर्स
उरण दि 29(विठ्ठल ममताबादे ) उरण मधील भेंडखळ गावाच्या भव्य मैदानावर चालू झालेली टी-20 लेदर क्रिकेटची लीग स्पर्धा चा थरार जेएनपीटी च्या हिरव्यागार मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेत मेगा फायनल मध्ये जय मल्हार संघाचा स्कोर 112/10(18.5ओव्हर) सहज (14.5 ओव्हर) मध्ये डी पी लायन्स संघाने पूर्ण करून विजय मिळविला. फायनल च्या म्यान ऑफ दी मॅच किताब प्रमोद पाटील यांना मिळाला. या स्पर्धेचा म्यान ऑफ दी सिरीज प्रथमेश म्हात्रे, तर बेस्ट बॉलर वैभव पाटील, बेस्ट फिल्डर विवेक ठाकूर, मोस्ट सिक्स भूषण म्हात्रे, बेस्ट बॅट्समन, मोस्ट फिफ्टी, मोस्ट 38 फोर असे तीन किताब संदीप पाटील (पपू) यांना मिळाले, फेअर प्ले अवॉर्ड एम जी मराठा टीम ला मिळाला. या स्पर्धेला माजी आमदार मनोहर शेठ भोईर , पनवेल महानगर पालिका विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे , रायगड व उरण 40+ चे अध्यक्ष अण्णा गावडे आणि विजय पाटील, उरण टेनिस अध्यक्ष महेश कडू,संतोष शेठ घरत सरपंच जासई, मंगेश भाई चौगले, जगजीवन भोईर, किरीट भाई पाटील, जितेंद्र ठाकूर, बी एन डाकी, विनोदभाई म्हात्रे, धनाजी शेठ ठाकूर, जितू भाई नाईंक, सदानंद ठाकूर, तसेच इतर अनेक मान्यवर यांनी भेट दिली. UPLअध्यक्ष शरद ठाकूर यांनी बक्षीस समारंभ कार्यक्रमात दोन्ही टीम चे अभिनंदन करून सन्मानित केले.तर पुढील 2022 च्या स्पधेसाठी तय्यार असल्याचे सुचोवत करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. या वेळी स्पर्धा पार पडण्यासाठी आर्थिक, तसेच बक्षीस स्वरूपात दिलेल्या देणगी दारांचे, मैदान उपलब्ध करून देणाऱ्या भेंडखळ ग्रामपंचायतीचे,जेएनपीटी स्पोर्ट क्लब चे, स्पर्धेतील सर्व टीम मालकांचे,कॅप्टन आणि खेळाडू, तालुका क्रिकेट पंच कमिटी, स्कोर राईटर, समालोचक व प्रेक्षक यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण लेदर क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी अजित म्हात्रे उपाध्यक्ष ,मंदार लवेकर उपाध्यक्ष, मनोज भगत कार्याध्यक्ष, अमित पाटील खजिनदार, शरद म्हात्रे, विकास घरत, संदीप पाटील पपू, दिनेश बंडा, संदीप तांडेल,अमित ठाकूर, भूषण म्हात्रे, रोशन पाटील, तसेच भेंडखळ क्रिकेट युवक यांनी सहकार्य केले.
 
                                                                     
                        		                     
							
