पोलादपूरची सत्ता भाजपच्या हाती द्या आणि नियोजनबद्ध विकास करुन घ्या.”‘-विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांचे आवाहन.
पनवेल /प्रतिनिधी :रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील नगरपंचायत पोलादपूरच्या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत शिवसेनेने केवळ विकासाच्या बाता मारल्या असून आतादेखील कोट्यावधी रुपयांच्या कामाच्या वल्गना केल्या जात आहेत.
केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपसरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ पोलादपूर शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी करून द्यायचा असेल भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडून द्या.”‘ असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पोलादपूर चे भूमिपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे केले.
“‘ पोलादपूर नगर पंचायत हद्दीत नळपाणी योजना, घनकचरा नियोजन, नाना नानी पार्क, सुसज्ज वाचनालय, तरुणांना नोकरीची संधी, व्यापारासाठी विविध सुविधा असाच सर्वंकष विकासाचा आराखडा राबवण्याचा असल्याने भारतीय जनता पक्षाच्या ८ उमेदवारांना पोलादपूरच्या मतदारांनी भरघोस मतांनी निवडून देण्याची गरज आहे, “‘ असे आवाहन करताना आ.दरेकर यांनी, “‘ विशाखा आंबेतकर, शीला बुटाला, रश्मी दिक्षित, हर्षदा बोरकर, मंजू मोरे, प्रसन्ना पालांडे, एकनाथ कासुर्डे व नितीन बोरकर या उमेदवारांचा नामोल्लेख करून मतदारांनी या उमेदवारांच्या प्रचार रॅली मध्ये आपणास विशेष अनुकूलता दर्शवित मतदान करण्याची भूमिका स्पष्ट केल्याने या नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला चांगल्या प्रकारे यश मिळेल ही खात्री वाटत असल्याचे “‘ यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
पोलादपूर शहर भाजपा महिला संघटक उज्वला मराठे तथा माई शेठ यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आ. प्रवीण दरेकर बोलत होते.
याप्रसंगी प्रदेश सदस्य मनोज भागवत यांनी पोलादपूरमध्ये अतिवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली असताना ज्यांच्या घरात दुकानांमध्ये चिखल निर्माण झाला होता अशांना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचे जेवण कोणत्याही प्रकारचा राजकीय भेदभाव न करता देण्यात आले, मात्र त्यानंतरच्या मदत वाटपामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना तसेच समर्थकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची खंत व्यक्त केली.
“‘ पोलादपूरकरांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या. नगरपंचायतीचा कारभार आ. प्रवीण दरेकर स्वतः लक्ष घालून चालवेल. एखादा कमी सदस्य निवडून आल्यास अन्य पक्षांच्या चांगल्या सक्षम नगरसेवकांसोबत सत्तास्थापन करु तसेच उर्वरित चार जागांसाठी निवडणूक लढवून यंदा भाजपची सत्ता आणू अशी ग्वाही देतानाच आ.दरेकर यांनी मतदारांनी त्यांचे भाजप उमेदवारांना दिलेले मत तुमच्या लाडक्या प्रवीण भाऊलाच देत असल्याची खात्री बाळगावी, “‘ असे भावनिक आवाहनही केले.
याप्रसंगी बिपीन महामुणकर, प्रदेश सदस्य मनोज भागवत, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र धुमाळ, तालुका अध्यक्ष तथा रायगड बँकेचे संचालक प्रसन्ना पालांडे, माई शेठ, संदीप ठोंबरे, कालिका अधिकारी तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.