क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच भव्य सभागृह उभारण्यासाठी मंजुरी देण्यात यावी : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनची रास्त मागणी….
पनवेल/रायगड
क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनतर्फे पनवेल महानगरपालिकेला क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच पनवेल मध्ये भव्य सभागृह उभारावे याकरिता मा.आयुक्तांना निवेदन देण्यात आले,
शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच पनवेल ह्या ठिकाणी कुठेच सभागृह व भवन उभारण्यात आले नाही आमचा समाज उपेक्षित राहता कामा नये म्हणून पनवेल महानगरपालिकेने पनवेल ह्या ठिकाणी एखादा भूखंड ताब्यात घेऊन त्या भूखंडाचा ठराव मंजूर करून भव्य सभागृह व भवन उभारण्यात यावा ही नम्र विनंती..
सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांनी केले. दलित, शोषित, अशिक्षित समाजासाठी त्यांनी जीवाचे रान केले. अश्या थोर समाजसुधारकांच्या सन्मानप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने सर्वप्रथम मंजूर करावा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच भव्य सभागृह , भवन उभारण्यात यावे अशी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे. सदर अर्जाची दखल घेत यावर तात्काळ विचार करावा अशी नम्र विनंती यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.