पनवेलमध्ये प्रथमच सप्तपदी वेडींग ज्वेलरी कलेक्शनच्या माध्यमातून रॅम्प वॉक ; बी.बी.बांठीया ज्वेलर्स अनोखा उपक्रम
पनवेल, दि.17 (संजय कदम) ः पनवेलमध्ये प्रथमच सप्तपदी वेडींग ज्वेलरी कलेक्शनच्या माध्यमातून नामांकित अशा तरुण व तरुणी वर्ग रॅम्प वॉक करणार असून शहरातील सुप्रसिद्ध बी.बी.बांठीया ज्वेलर्स यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत असल्याने अनेकांचे लक्ष येत्या 27 फेब्रुवारी या तारखेकडे लागले आहे.
7 पिढ्यांच्या दागिन्यांची हौस भागवणारे बी बी बांठिया ज्वेलर्स हे रायगड जिल्ह्यात खात्रीशीर दागिन्यांचे व्यापारी म्हणून सुपरिचित आहेत. रायगड जिल्ह्यात प्रथमच या प्रकारच्या ज्वेलरी फॅशन शो चे आयोजन होत आहे त्यामुळे पनवेल, उरण सह नवी मुंबई व रायगड परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसुन येत आहे. हल्लीच्या जमान्यात ग्राहक चोखंदळ झाला असून पूर्वीसारखे कॅटलॉग बघून दागिन्यांची खरेदी होत नाही. ग्राहकांनी हटके आणि निरनिराळ्या पद्धतीची डिझाईन्स डोळ्यासमोर पाहायला आवडतात. ग्राहकांची हीच गरज ध्यानात ठेऊन आम्ही अत्यंत आकर्षक पद्धतीने भारतातील निरनिराळ्या ठिकाणी प्रसिद्ध असलेली वेडिंग डिझाईन्स तयार केली आहेत. ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. या ज्वेलरी फॅशन शो चे नियोजन अथर्व मीडिया वर्ल्ड चे सर्वेसर्वा मिलिंद राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असून प्रसिद्ध फॅशन शो दिग्दर्शक यश शेलार हे फॅशन शो साठी दिग्दर्शन करणार आहेत. तसेच या दागिन्यांची घडणावळ ज्वेलरी कन्सल्टंट नवीन सदारंगानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक निर्बंध अद्यापही काही प्रमाणात लागू असल्याने मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे, त्यासाठी प्रवेशिका बांठिया समूहाकडून वितरित करण्यात येतील. असे असले तरीही तमाम जनतेला सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत पत्रकरांशी संवाद साधताना राजेश बांठिया यांच्यासमवेत यासपीठावर गौरव बांठिया, वैभव बांठिया, सुयोग बांठिया आदि मान्यवर उपस्थित होते.
फोटो ः बांठीया उद्योग समुह नवीन उपक्रमाची माहिती देताना
