वाघेज पावभाजी सेंटरमध्ये घरफोडी
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः शहरातील वाघेज पावभाजी सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कमेसह इतर ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
शहरातील वाघेज पावभाजी सेंटर हे बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून आतमध्ये असलेली रोख रक्कम व इतर ऐवज चोरुन नेला आहे. यावेळी त्यांच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाल्या आहेत.
फोटो ः वाघेज वडापाव