संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या अध्यक्ष पदाची श्री. दर्शन ठाकूर यांच्यावर जबादारी
पनवेल /प्रतिनिधी
संजय गांधी निराधार अनुदान समितीचे” अध्यक्ष श्री. दर्शन ठाकूर यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा कार्यभार तहसीलदार कचेरी पनवेल येथे तहसीलदार मा.श्री. विजय तळेकरसाहेब व रायगड भूषण माजी नगरसेवक डॉ. शिवदास कांबळे* यांच्या उपस्थितीत स्वीकारला
संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार एकनाथ नाईक* यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे स्वागत करून *मा.तहसीलदार यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या* तसेच समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल *पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री. गणेश देशमुखसाहेब* यांनी वृक्ष कुंडी देऊन स्वागत केले.
त्यानंतर *योजनेची संपूर्ण माहिती योजनेचे लाभार्थी आज मितीस मिळत असलेल्या लाभार्थ्यांची माहिती* या संबंधात सविस्तर चर्चा श्री. दर्शन ठाकूर यांनी योजनेचे नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची ओळख करून घेतली.
*4800 लाभार्थी आज या योजनेचा फायदा घेत* असून *मा.ना.पालकमंत्री कु. आदिती तटकरे* यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारीनुसार मी *पनवेल तालुक्यातील निराधार विधवा अपंग परितक्त्या व विशिष्ट आजाराने ग्रस्त नागरिकांना याचा फायदा देऊन ही संख्या दुपटीने वाढवण्याचा माझा मानस आहे.*
या कामांमध्ये मला *मा.श्री. प्रशांतभाऊ पाटीलसाहेब* सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश व *मा.डॉ. शिवदास कांबळेसाहेब* यांचे मोलाचे सहकार्य शासकीय काम करताना लाभत आहे. त्या सर्वांचे आभार मानून *खासदार मा.श्री. सुनिल तटकरेसाहेब मा.ना. आदितीताई पालकमंत्री यांचे विशेष आभार मानत आहे.*