सार्वजनिक सुलभ शौचालय तोडल्याने पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस चा तीव्र निषेध
पनवेल /प्रतिनिधी
पनवेल शहराच्या मधोमध शिवाजी चौक येथे असलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालय पनवेल महानगरपालिकेच्या वतीने रात्रीच्या अंधारात तोडून नष्ट केलं त्याचा जाहीर निषेध* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज मा.आयुक्त महानगरपालिका श्री गणेश शिंदेसाहेब* यांना निवेदन देऊन केला.
याप्रसंगी पनवेल तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व संजय गांधी निराधार योजनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दर्शन ठाकूर उपस्थित होते.
सदरचे शौचालय हे सर्वसामान्य ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या सोयीचे होते हे शौचालय उध्वस्त करून महिला वर्गावर ती महापालिकेने अन्याय केला आहे आणि *यामागे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार होऊन शौचालयाच्या पाठीमागे असलेल्या दुकानदारांना आणि इमारतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हे शौचालय तोडण्यात आल्याचा आरोप पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष व मा.नगरसेवक शिवदास कांबळे यांनी केला आहे.
श्री. शिवदास कांबळे नगरसेवक असताना हे शौचालय वाचवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले होते आणि यामागे ज्या लोकांचा हात आहे त्यांना हे शौचालय तोडण्यापासून थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केलेला होता*
शौचालय पूर्ववत पुर्ण महापालिकेने तयार करून नागरिकांची गैरसोय दूर केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री. प्रशांत भाऊ पाटील व पनवेल जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक मा.श्री. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा मा.श्री. शिवदास कांबळे यांनी दिलेला आहे.