सफाई, घंटागाडी आणि धुर फवारणी कंत्राटी कामगारांना उत्तम गुणवत्तेचे रेनकोट व स्लीपर देण्याची आझाद कामगार संघटनेची मागणी
पनवेल दि. १६ पनवेल महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई, घंटागाडी आणि धुर फवारणी कामगारांना सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट रूल २०१६ नुसार पावसाळ्याचे उत्तम गुणवत्तेचे रेनकोट व स्लीपर देणेबाबत तशा सुचना संबंधित ठेकेदाराला द्याव्यात अशी मागणी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे .
पनवेल महानगर पालिका ठेकेदार यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या सफाई, घंटागाडी आणि धुर फवारणी कंत्राटी कामगारांना उत्तम गुणवत्तेचे रेनकोट व स्लीपर देण्याच्या सुचना कराव्यात मागील वर्षी अनेक कामगारांना चांगल्या प्रतीच्या वस्तू मिळाल्या नव्हत्या तश्या तक्रारी देखील आझाद कामगार संघटनेने केल्या होत्या. रेनकोट व चप्पल घेण्यासाठी काही कामगार व युनियन प्रतिनिधी यांना विश्वासात घेवून उत्तम गुणवत्तेचे रेनकोट व स्लीपर कामगारांना देण्यात याव्यात तशा सुचना आपण ठेकेदारांना देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे .