जबरी चोरीतील फिर्यादीच निघाला आरोपी: खांदेश्वर पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल
पनवेल दि. ०१ : जबरी चोरी संदर्भात फिर्याद देणारा इसमच आरोपी निघाला असून या गुन्ह्याची उकल तांत्रिक तपासाद्वारे व सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे केल्याने खांदेश्वर पोलिसांचे कौतुक होत आहे.
तक्रारदार नामे उमेश दगडू कदम वय ४२ वर्ष, रा. गुजरात वापी हे त्यांच्या मालकीचा आयशर ट्रक क. GI-15-XX-1216 मध्ये माल घेवून पुणे मुंबई अशी वाहतुक करीत असताना एक्सप्रेस वे संपण्यापूर्वी १००० मीटर अंतरावर आल्यावेळी दोन इसमांनी ट्रक ला हात दाखवून, ते गाईड असल्याचे सांगून ट्रकमध्ये बसले व साकेत ब्रीज येथे आल्यावेळी तक्रारदार यांना चाकूचा धाक दाखवून ट्रकमधून खाली उतरवून मालासह ट्रक जबरी चोरी करून घेवून गेलेबाबत तक्रारदार यांनी कापूरबावडी पोलीस स्टेशन जि. ठाणे येथे तक्रार दिली होती. सदर गुन्हयाची सुरुवात खांदेश्वर पोलीस ठाणे हददीतून झाल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्हा पुढील तपासकामी खांदेश्वर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला होता. त्याअन्वये खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गु.र.क. १४२/२०२२ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. पोलीस उप आयुक्त, परि २ पनवेल शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भागवत सोनवणे यांनी वेळोवेळी पोलीस ठाणेत भेटी देवून सदर गंभीर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.नमुद गुन्हयात चोरीस गेलेला ३ लाख रूपयांचा आयशर ट्रक क्र. GJ-15-XX-1216 व ४,६२,७५९/- रूपयांचा ट्रकमधील मालाचा शोध घेत असताना खांदेश्वर पोलीसांनी कळंबोली एक्सप्रेस वे पासून ते साकेत ब्रीज ठाणे दरम्यानच्या रोडवरील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली परंतु त्यामध्ये फिर्यादींचा ट्रक जाताना दिसून आला नाही. त्यामुळे फिर्यादींवर शंका निर्माण झाल्याने पोलीसांनी फिर्यादीकडे केलेल्या कैशल्यपुर्वक तपासात व तांत्रिक तपासाच्या आधारे सदरचा गुन्हा तक्रार देणारे ट्रक चालक यांनी केला असल्याचे व गुन्हा घडल्याचा बनाव करून खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाच्या तपासात चोरीस गेलेला ३,००,०००/- रूपये किंमतीचा आयशर ट्रक क्र. 6/ 15-XX-1216 व ८०, ९२०/- रूपये किंमतीच्या कन्ट्रक्शनसाठी लागणाऱ्या लोखंडी पाईप असा एकूण ३,८०,९२०/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून गुन्हयातील माल हा फिर्यादींनीच विक्री केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात भा.द.वि. कलम ४०७ वाढ करण्यात आली आहे. नमुद गुन्हयाचा अधिक तपास स.पो.नि. समीर चासकर करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परि २ पनवेल शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भागवत सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. समीर चासकर, पो.ना. भाऊराव बाचकर, पो. ना. चेतन घोरपडे, पो.ना. अमित पाटील यांनी केलेली आहे.
फोटो: गुन्ह्याची उकल केल्या संदर्भात माहिती देताना पोलीस अधिकारी.