कामोठे शहरात बूस्टर डोस लसीचे सेंटर चालू करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल दि.०८ : कामोठे वसाहतीमध्ये कोविड – १९ चे प्रमाण वाढत असल्यामुळे बूस्टर डोस लसीकरणाची मोहीम सुरु करावी त्याचे सेंटर चालू करावे अशी मागणी कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कामोठे शहरात कोविड-१९ ची ज्यांचे २ डोस झाले आहेत त्यांच्या साठी बूस्टर डोस लसीचे सेंटर चालू करावेत. प्रत्येक सोसायटी मध्ये जाऊन ज्या नागरिकांचे २ डोस झाले आहेत त्यांना बूस्टर डोस द्यावेत आणि ५ ते ८ स्कूल मध्ये आणि मंदिर मध्ये कोविड-१९ चे बूस्टर डोसचे लस सेंटर चालू करावे त्या मुळे ६० वर्षांच्या वरती आणि अपंग वक्तीना लस घेता येईल आणि त्यामुळे रहिवाशांना त्रास होणार नाही तरी लवकरात लवकर ह्या सुविधा करून द्यावेत अशी मागणी उप विभाग प्रमुख प्रभाग क्र-१३ सचिन मनोहर त्रिमुखे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगर पालिका आनंद गोसावी यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी प्रशांत आनंदे उप विभाग प्रमुख, बबन खणसे शाखा प्रमुख सेक्टर-18, संतोष पवार शाखा प्रमुख सेक्टर -9 आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगर पालिका आनंद गोसावी यांना निवेदन देताना पदाधिकारी

