पनवेल महानगर महिला बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम; कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांना 25 हजाराची मदत
पनवेल दि.१३ : पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागातर्फे कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिला, मुला मुलींना २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. याबाबत महिला बालकल्याण विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन सभापती हर्षदा अमर उपाध्याय यांनी केले आहे.
योजनेचे अर्ज महिला व बालकल्याण विभागात उपलब्ध असून गरजू लाभार्थ्यांनी सदर अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी १ एप्रिल २०२१ नंतर कॅन्सर या आजाराचे निदान झालेल्या रुग्णास सदर लाभ दिला जाईल. वयवर्षे ० ते १८ वर्षाच्या खालील मुलामुलींना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचाअधिक फायदा होणार आहे. संबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट : पात्रता – दिनांक १/०४/२०२१ नंतर कॅन्सर आजाराचे निदान झालेल्या रुग्णास सदरचा लाभ दिला जाईल. तसेच मुलांचे वय ते १८ वर्षाचे खालील असावे. कुटुंबाचे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात किमान ३ वर्षे वास्तव्य असलेबाबत पुरावा म्हणून भाडे करारनामा. रेशनकार्ड, मालमत्ता कर भरल्याची पावती सादर करणे बंधनकारक आहे. (यापैकी कोणताही १ पुरावा). अर्जासोबत पनवेल महानगरपालिका हद्दीतील पिवळे व केशरी रेशनकार्डाची छायांकित प्रत जोडणे आवश्यकआहे. अर्जासोबत रुग्णाचे आधारकार्डची, पॅनकार्ड यांची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्जासमवेत RTGS साठी बँकेचे पासबूकची अथवा रद्द धनादेशाची (Cancelled Cheque) छायांकित प्रत जाडणे आवश्यक आहे. सदरच्या योजनेचा लाभ एकदाच दिला जाईल. अर्जासोबत कॅन्सर निदान झालेबाबत वैद्यकिय अधिका-याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लावणे आवश्यक राहील. सन्मा. नगरसेवक / नगरसेविका हे संबंधित अर्जदारास ओळखत असल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखल केलेल्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने लाभ घेणेकरिता एखाद्या अर्जदाराने खोटी माहिती अथवा बनावट दस्ताऐवज सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदर लाभ नाकारण्याचा सर्वस्वी अधिकार आयुक्त पनवेल महानगरपालिका यांना असेल. अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे स्वसाक्षांकित केलेली असावीत. प्रत्यक्ष लाभ देतेवळी लाभार्थी हयात आहे किवा नाही याची खातरजमा करून लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल,