वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून चेहऱयावर फुलवला आनंद…सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लाटे यांचा वाढदिवशी उपक्रम
पनवेल/प्रतिनिधी :– पोलिस म्हटले की धवापळीचे जीवन. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असतात. स्वतःबरोबरच कुटुंबियांकडेही त्यांना लक्ष द्यायला वेळ नसतो. पण, नवी मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले स्वप्नील लाटे यांनी आपला वाढदिवस आदिवासी कर्णबधिर-मतिमंद निवासी विद्यालय व साई आश्रय निराधार वृद्धाश्रमात शनिवारी साजरा केला आहे. स्वप्नील लाटे असे पोलिस अधिकाऱयाचे नाव आहे.
नवी मुंबई पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले पोलिस अधिकारी स्वप्नील लाटे यांचा शनिवारी 9 जुलै रोजी वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवस कोप्रोली येथील कै.रामचंद्र कुरुळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आदिवासी कर्णबधिर-मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांना क्रिकेट खेळाचे साहित्य, तसेच भेटवस्तू देऊन त्याठिकाणी वाढदिवस साजरा केला त्याचबरोबर नवीन पनवेल येथील साई आश्रय या निराधार वृद्धाश्रमात साजरा केला. यावेळी तसेच निराधार वृद्ध, महिला, पुरुष यांना भेटवस्तू, फळे व मिठाईचे वाटप करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱयावर आनंदाची झळक होती. यावेळी स्वप्नील लाटे यांना त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर लाटे हे वेळोवेळी गोरगरिबांना मदतीसाठी धावत असतात. पालघर येथील मोखाडासह इतर ठिकाणी गोर-गरीब व लहान मुलांना त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्य, भेटवस्तू, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य भेट म्हणून देत असतात. गोर-गरिबासाठी धावणारे लाटे यांचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून चांगल्या कामासाठी दान केले. श्री.लाटे म्हणाले, ‘वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून चांगल्या कामासाठी दान केल्याने मला समाधान मिळाले आहे. हा आनंद काही वेगळाच असतो.’ यावेळी साई आश्रय वृद्धाश्रम चे किरण पाटील, ज्योती पाटील, आदिवासी कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयाचे सौ.ललिता कुरुळकर, प्रफुल चुनेकर, मनोज कुरुळकर, यांच्यासह जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत कुंभार, पत्रकार केवळ महाडिक, रवींद्र गायकवाड, संतोष आमले, अनुराग वाघचौरे हे उपस्तित होते.

