कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणी पुरवठा होत असल्याबाबत शिवसेनेने सिडकोला विचारला जाब
पनवेल दि.२८(संजय कदम): गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणी पुरवठा होत असल्याने तेथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. येत्या गणेशोत्सवाच्या कालावधीततरी पाणी पुरवठा सुरळीत करा अशी मागणी सिडकोच्या अधिकाऱ्यांना कामोठे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून त्यांना याबाबत जाब विचारण्यात आला आहे.
शिवसेना कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उप शहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे, विभाग प्रमुख बबन गोगावले, विभाग संघटक संजय जंगम, शाखा प्रमुख बबन खणसे, ज्येष्ठ शिवसैनिक वासुदेव शेडगे व इतर पदाधिकारी यांनी सिडकोचे मुख्य कार्यकारी अभियंता चोथानी आणि कार्यकारी अभियंता प्रशांत चेहरे यांची भेट घेतली व यावेळी संपूर्ण कामोठे शहरातील अजून पण अनियमित आणि कमी प्रमाणात होत असलेल्या पाणी पुरवठा बाबत जाब विचारला तसेच सेक्टर 17,18,34,35 36 मध्ये तर सलग दोन दोन दिवस पाणी येत नसून नागरिक खूप त्रस्त आहेत. अजून पण सोसायटी मध्ये नियमित पाणी येत नाही आणि खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे आणि दिवसातून फक्त १ ते २ तास पाणी येत आहेत रोज शिवसेनेकडे याबाबत तक्रारी येत असून रोज टँकर चे पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तरी त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
फोटो: कामोठे शिवसेनेच्यावतीने सिडको अधिकाऱ्यांना देण्यात आलेले निवेदन.