अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध सुरु
पनवेल दि.१२ : अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
तालुक्यातील नांदगाव गावाच्या समोर टी पॉईंट ते पळस्पे कडे जाणाऱ्या रस्त्यावर ब्रिज जवळ एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला असून रंग कला व सावळा, डोक्याचे केस अर्धवट टक्कल, साधारण वाढलेले कुरळे काळे, उंची ५.८ इंच, दाढी व मिशी वाढलेली असून, मयताच्या डाव्या हातावर अंगठ्याच्या वरील बाजूस रेणू असे इंग्रजी मध्ये लिहलेले आहे. तसेच डाव्या हाताच्या अंगठ्याच्या व बाजूच्या बोटाच्या मध्यभागी असलेल्या जागेमध्ये आडवे गोंधळले आहे. तर डाव्या हाताच्या मनगटा पासून कोपऱ्यात अनिल असे इंग्रजीमध्ये लिहलेले आहे. त्याच्या अंगात मेहंदी रंगाचा फुल टी-शर्ट व फिक्कट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे. तसेच गळ्यामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या चौकडी रेषा असलेलं रूमाल आहे.या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर – ०२२-२७४५२३३३ किंवा सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांच्याशी संपर्क साधावा
फोटो: मयत इसम.