आई बाबा फाउंडेशन व्यसनमुक्ती जनजागृती पंधरवडा राबवणार
पनवेल/ प्रतिनिधी
मुंबई पुणे हायवे वरील चौक आसरेवाडी येथील आई बाबा फाउंडेशन च्या वतीने महात्म्य गांधी जयंती निमित्त व्यसनमुक्ती पंधरवडा राबवणार आहे
आई बाबा फाऊंडेशनची टीम माध्यमिक शाळा व कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती करणार असल्याचे आई बाबा फाऊंडेशन चे संचालक प्रवीण नवरे यांनी सांगितले.
त्याच बरोबर आई बाबा फाऊंडेशन या व्यसनमुक्ती केंद्र चे काम प्रत्यक्षात कसे चालते याची माहिती दिली यामध्ये व्यसनाधीन व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला मानसिक शारिरीक स्वास्थ्यकडे लक्ष देऊन तज्ञ डॉक्टर च्या कडून औषध व मानसोपचार केला जातो त्याचबरोबर त्यांच्या आहाराकडे लक्ष दिले जाते आणि सहा महिन्याच्या काळामध्ये त्यांना पूर्णपणे व्यसनातून मुक्त होण्याची मानसिकता तयार करतात अशा या चौक येथील आसरे वाडी निसर्गरम्य ठिकाणी 160 होऊन अधिक रुग्ण व्यसनमुक्तीसाठी उपचार घेत आहेत.
येथील उपचारासाठी आलेल्या प्रत्येकाचा छंद, कला व शैक्षणिक जोपासण्यास वेगळी व्यवस्था केली जाते,
त्याचबरोबर सर्व धर्म जाती धर्माचे सण साजरी करत असतात.
याच विशेष वैशिष्ठने आई-बाबा फाउंडेशन मध्ये अनेक लोक येऊन व्यसनापासून मुक्त होत आहेत.
या आई बाबा फाऊंडेशन चे संचालक प्रवीण नवरे व प्रसाद ओक व्यवस्थापण करत आहेत अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रवीण नवरे 7775993372