सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे कडून गतिरोधकांना पांढरे पट्टे
उरण प्रतिनिधी :नंदकुमार तांडेल : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सेवाभावी संस्था सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरेच्या 6 व्या वर्धापनदिनचे औचित्य साधून रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी मकरसंक्रांतच्या शुभ मुहुर्तावर चिरनेर ते कोप्रोली दरम्यान गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्याचे सुंदर उपक्रम राबविण्यात आले.गतिरोधक वाहनचालकांच्या लक्षात यावेत,रात्रीच्या वेळी अचानक गतिरोधक समोर आल्यास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते, रस्त्यावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्यावेळी अंदाज न आल्यास अपघात होऊ नये इत्यादी कारणांसाठी संस्थेकडून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. संस्थेचे प्रेरणास्थान तसेच श्रद्धास्थान सचिन तांडेल यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करून सदर उपक्रमास सुरवात करण्यात आली. सदर उपक्रमात अनेकांनी उस्फूर्त सहभाग घेतला. या मध्ये कळंबुसरे ग्रामपंचायत सरपंच उर्मिला नाईक, उपसरपंच सारीका पाटील, सदस्य गजानन गायकवाड यांनी उपक्रमास भेट देऊन सक्रीय सहभाग घेतला. त्याच बरोबर अँड निनाद नाईक, कळंबुसरे गाव अध्यक्ष महेश पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. त्याच प्रमाणे संस्थेस नेहमीच बहुमूल्य सहकार्य करणारे चिरनेर येथील प्रसिद्ध रंगभूमी कलाकार, आर्टिस्ट सिद्धेश घरत सर, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय केणी सर यांनी देखील उपक्रमास भेट देऊन मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तांडेल यांनी सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घेतलेल्या गावातील होतकरू तरुणांचे यावेळी आभार मानले. त्यात विशेषत: सामाजिक कार्यकर्ते पद्माकर पाटील,पंकेश नाईक,अरूण पाटील यांचे आभार मानले. सदर उपक्रमास अनेक दानशूर व्यक्तींनी हातभार लावून संस्थेच्या उपक्रमात सहकार्य केले. या उपक्रमात संस्थेचे सभासद रत्नाकर केणी सर,समीर म्हात्रे सर,अमित पाटील,नयन म्हात्रे,बळीराम पाटील यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. संस्थेच्या सर्व सभासदांकडून सदर आयोजित उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले.