कामोठे येथील पेट्रोल पंप लवकरात लवकर सुरु करण्याची कामोठे कॉलोनी फोरमची मागणी
पनवेल महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र ( O.C) न दिल्यामुळे पेट्रोल पंपाचे लोकार्पण रखडले
प्रतिनिधी /पनवेल(प्रेरणा गावंड)
कामोठे येथील पेट्रोल पंपाचे काम पुर्ण झाले असुन गेल्या वर्षीच हा पेट्रोल पंप सुरू होईल अशी सर्व कामोठेकरांना आशा होती. मागच्या वर्षी कामोठे कॉलोनी फोरम यांनी पाठपुरावा केला असता एप्रिल 2022 मधे पेट्रोल पंप सुरू करणाचे नियोजन असल्याचे इंडियन ऑईल च्या अधिकार्यांनी सांगितले होते.
कामोठेकरांना पेट्रोल साठी कळंबोली, खांदा कॉलोनी ला जावे लागत आहे. याबाबत असंख्य तक्रारी कामोठे कॉलोनी फोरम कडे प्राप्त झाल्यामुळे नागरिकांच्या मागणीची दखल घेत कामोठे कॉलोनी फोरमच्या समन्वयकांनी पेट्रोल पंप धडक देत कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनी द्वारे माहितीत पंपाचे काम वर्षभरापासुन तयार असुन पनवेल महापालिकेकडे इंडियन ऑईल ने भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचे कळले .
पालिकेची भोगवटा प्रमाण पत्र मान्यता मिळावी म्हणून कॉलोनी फोरम पालिका आयुक्तां कडे पाठपुरावा करून कामोठे करांची वणवण थांबवणार असल्याचे फोरम शिष्टमंडळ अध्यक्ष मंगेश अढाव ह्यांनी मत व्यक्त करत “कामोठेकरांची वणवंत थांबणार का… पेट्रोल पंप लवकरात लवकर चालू करणार का…अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या .
ह्यावेळी कामोठे कॉलोनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा, गीता कुडाळकर, शुभांगी खरात, शितल दिनकर,बापु साळुंखे, राहुल बुधे,अरुण जाधव, सुनिल कर्पे, राघव गट्टेवार, रवी पाढी, संतोष अलदर , सचिन खरात, जयवंत खरात, प्रविण भालतडक उपस्थित होते.