भारती विद्यापीठ नवी मुंबई आयोजित परिषद
पनवेल प्रतिनिधी
भारती विद्यापीठ नवी मुंबई शैक्षणिक संकुलाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० विषयावार एक दिवसीय परिषद आयोजित केली.परिषदेचे उदघाटन डॉ. विलासराव कदम,प्रादेशिक संचालक, भारती विद्यापीठ मुंबई ह्यांनी करून आयोजक,वक्ते आणि उपस्थित विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख वक्ते डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू, मुंबई विद्यापीठ ह्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या विविध गोष्टीबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. श्रीरंग जोशी, इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि, मुंबई ह्यांनी अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट बद्दल विशेष मार्गदर्शन केले. वक्ते डॉ. विजय जोशी, संचालक, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ह्यांनी संस्थेला मिळत असलेल्या शैक्षणिक स्वायत्तता आणि एन आय आर आय एफ ह्या विषयावर मार्गदर्शन केले आणि डॉ. आत्माराम पवार, प्राचार्य, बी व्ही डी यू, पुणे कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे ह्यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. श्रीनिवासन व्ही. प्राचार्य, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ डेंटल, मुंबई ह्यांनी परिषदेतील वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. प्राचार्य पी एन टंडन, भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी,नवी मुंबई ह्यांनी सर्व आयोजक,संचालक,प्राचार्य,प्रमुख वक्ते तसेच उपस्थित सर्व प्राध्यापकांचे परिषद यशस्वी करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.