धर्मादाय आयुक्तांनी याकूब बेग ट्रस्ट १०८ / बी पनवेल यांच्या गैरकारभाराची चौकशी करावीया कूब बेग ट्रस्टच्या मिळकतीचा होतोय गैरवापर ?
पनवेल / प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातच नव्हे तर पनवेल तालुक्यात याकूब बेग ट्रस्ट एक मोठी ट्रस्ट आहे. या ट्रस्टतर्फे पनवेल परिसरात विविध सामाजिक व लोकोपयोगी कामे केली जात होती. मात्र हि सामाजिक कामे करताना कुठल्याही व्यक्ती, इतर कोणत्याही संस्थांकडून कधीही देणगी न घेणारी त्याचप्रमाणे उलट ट्रस्टमध्ये असलेल्या मिळकतीतून इतरांना निधी देणारी संस्था म्हणून याकूब बेग ट्रस्ट प्रसिद्ध होती. याकूब बेग ट्रस्टचा कारभार १४/०९/२०२२ रोजी नवीन कार्यकारणीमध्ये अलिबाग सत्र न्यायालय यांच्या आदेशाने अलहद मोहम्मद मुस्तफा याकूब बेग यांच्या जागी ऍड. मुजफ्फर मुस्तफा बेग यांची निवड झाली.
त्यामुळे ट्रस्टचा कारभार काही भ्रष्ट्राचारी लोकांच्या हातात गेल्याची चर्चा सुरु झाली. गेल्या ७ महिन्यांपासून ट्रस्टशी काडीचाही संबंध नसलेले तथाकथीत विकास गायकवाड व तथाकथित विलास गायकवाड हे ट्रस्टच्या कार्यालयात ठिय्या मांडून आहेत. सदर दोन भाऊ हे ट्रस्टच्या कार्यालयात ट्रस्टी मुजफ्फर बेग यांच्या म्हणण्याप्रमाणे लाभार्थी आणि सेटलर वंशज यांना विचारपूस करून व त्यांच्या कामात दखल देऊन त्यांना दमदाटी व दादागिरी करण्याचा आरोप याकूब बेग ट्रस्टचे सेटलर वंशज यांनी केला आहे. ट्रस्टचे लाभार्थी व सेटलर वंशज यांनी ट्रस्टच्या विरोधात काम करू नये म्हणून ते शांत आहेत, मात्र याची दखल धर्मादाय आयुक्तांनी घेणे गरजेचे आहे. परंतु सध्या तीन ट्रस्टी मुजफ्फर मुस्तफा बेग, युसूफ अकबर खान व इम्रान सलीम शेख कार्यरत आहेत. ट्रस्टमध्ये विवादी विषय असून ह्या विषयाचा दावा २००४ पासून केस क्रमांक १२९ सुरु आहे. त्या केसमध्ये ट्रस्टी मुजफ्फर बेगनी ट्रस्टच्या विरुद्ध असलेली पार्टी संजय आलूवालिया यांना विषय सेटल करण्याचे आश्वासन देऊन ट्रस्टकरीता २५ लाखाची देणगी कबूल करण्यात आली. ३५० चौरस मिटर ३५ हजार स्केअर फिट जागेचा करार ४८ वर्षाकरिता केला आहे. त्याच जागेचे भाडे मात्र १०,५०० ठरवण्यात आले. इतके मोठे नुकसान केल्याची चौकशी देखील होणे गरजेचे आहे.
याचे कारण रुपाली सिनेमाजवळ सध्या गाळेभाडे हे २५ ते ३० हजार आहे. त्यामुळे नुकसानदायक व्यवहार हा जानेवारी २०२३ पासून तीन ट्रस्टींकडून करण्यात आला आहे.
सात महिन्यांपासून दोन ट्रस्टीची पदे रिकामी झाल्यानंतर त्या जागी दोन नवीन ट्रस्टीची नेमणूक करणे आवश्यक असतानाही अदयापपर्यंत कोणतीही प्रोसेस न झाल्याने पाच ट्रस्टिंचा कोरम पूर्ण होत नाही. परंतु तरीही सध्या कार्यरत असलेले तीन ट्रस्टी स्वतः मनमानी कारभार करीत असून यामुळे याकूब बेग ट्रस्टचे नाव कलंकित होत असून भविष्यात या ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणे पाहायला मिळू शकतात. याकूब बेग ट्रस्टच्या लाभार्थी यांना सध्याचे तथाकथित विकास गायकवाड व तथाकथित विलास गायकवाड हे दमदाटी व त्यांची दिशाभूल करीत असल्याचे चित्र असून धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून बेकायदेशीर कारभार सुरु असणाऱ्या या ट्रस्टच्या व्यवहाराला लगाम घालावा व ट्रस्टीच्या निवडणूका लावून कायदेशीर मार्गाने पदाधिकारी यांची नेमणूक करावी तसेच संपूर्ण जमा खर्चाचा देखील योग्य हिशोब लावून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी याकूब बेग ट्रस्टचे सेटलर वंशज यांनी केली आहे.