तळोजा पाणी प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद ढगेपाटील यांचा आंदोलनाचा इशारा वीस दिवसापासून पाण्याविना जनता त्रस्त
तळोजा/प्रतिनिधी: गेल्या वीस दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्यामुळे तळोजा येथील जनता त्राहिमाम् करत आहे. तळोजा मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे परंतु अलीकडच्या काही दिवसांमध्ये कहरच झाला आहे. येथील सिडको प्रशासन जनतेला पाणी देण्यासाठी अकार्यक्षम ठरले आहे. सिडको अधिकाऱ्यांना फोन केला असता व संपर्क साधला असता तेथे एमआयडीसी कडून कमी दाबाच्या पाण्याचे कारण सांगतात.
मागील आठवड्यामध्ये दहा एमएलडी पाणी वाढवून दिले आहे असे सिडकोकडून घोषित करण्यात आले होते परंतु या ना त्या सबबीखाली शटडाऊन करून जनतेला वेठीस धरण्याचे काम सिडको मार्फत होत आहे.
पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ पाच वर्षे होत आली परंतु महाराष्ट्रातील अन्य महानगरपालिका सारखे स्थाई जलस्रोत पनवेल महानगरपालिकेकडे नाहीत.
अगोदरच कोरोना ने त्रस्त झालेल्या व आर्थिक कमकुवत झालेल्या जनते वर भरमसाठ प्रोपर्टी टॅक्स लादून सुविधा मात्र कोणत्याही दिल्या जात नाहीत.
या सर्व पाणी समस्येचे कारण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचा सुर जनतेतून व्यक्त होत आहे व प्रशासनावर जनता प्रचंड नाराज आहे आणि वारंवार पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव व तळोजाफोरम संस्थापक प्रसाद ढगे पाटील यांच्याकडे जनतेतून मागणी होत आहे व जनता पूर्णपणे त्यांना पाणी प्रश्नावरून समर्थन देण्यास तयार आहे, तळोजा फेज 1 व 2 येथे अनेक ठिकाणी मीटिंग घेऊन जनतेने श्री प्रसाद पाटील यांना पाणी प्रश्नासंदर्भात आंदोलन करण्यासाठी समर्थन दिले असून
लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सिडको व महानगरपालिका सोडवला नाही तर तीव्र आंदोलन करण्याची मागणी जनतेतून होत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाण्याची गती वाढवण्यासाठी जलकुंभ बांधण्याचे काम होऊन सुद्धा प्रत्यक्षात उभारणीस सुरुवात होत नाही
प्रतिक्रिया
आठवड्याभरात पाण्याचा प्रश्न जर सुटला नाही आणि पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर सिडको वर हंडा मोर्चा येऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात येईल
प्रसाद सुभाष ढगेपाटील
जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी