मच्छरांच्या त्रासापासून नागरीक त्रस्त आणि वसई विरार महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष,विरार महानगरपालिकेला सत्यमेव जयते ट्रस्ट च्या माध्यमातून पत्र देण्यात आले.
वार्ताहर: माननीय श्री डी गंगाथरन.
आयुक्त- वसई विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय, विरार (पू). यांना सत्यमेव जयते ट्रस्ट च्या माध्यमातून पत्र देण्यात आले.
सत्यमेव जयते ट्रस्ट चे अभिजीत दिलीप सांगळे राष्ट्रीय सरचिटणीस सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया यांनी विनंती केली आहे की गेल्या काही वर्षाचा आधी ग्रामपंचायत असताना जेव्हा गटारे उघडी होती तेव्हा देखील मच्छरांचा जेवढा सुळसुळाट संपूर्ण आगाशी परिसरामध्ये नव्हता तेवढा नगरपालिका आल्यानंतर गटारे बंद झाल्यानंतर मच्छरांचा सुळसुळाट झाला आहे आगाशी परिसरातील बहुतेक नागरिक हे मच्छरांच्या त्रासाने त्रस्त झालेले आहे. मच्छर मुळे होणारे डेंग्यू मलेरिया यासारखे रोग हे जास्तीत जास्त प्रमाणात पसरू नये किंवा याची लागण बऱ्याच लोकांना होऊ नये म्हणून नित्यनियमाने आगाशी परिसरातील बऱ्याच छोट्या छोट्या गावांमध्ये नियमितपणे रासायनिक फवारणी व्हावी अशी मागणी मी सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाकडून वसई-विरार महानगरपालिका विभाग ‘अ’ कडे करत आहे.
परंतू वसई विरार तसेच आगाशी परिसरांत नित्यनियमाने औषध फवारणी होईन असे कुठलेही आश्वासन नगरपालिके कडून देण्यात आले नाही आहे. वसई विरार नगरपालिकेचे निवडणूक ही पुढे गेली असल्या कारणाने माझी नगरसेवक या सर्व बाबीत लक्ष देत नसल्याचे विधान अभिजीत सांगळे यांनी केले आहे. बोळींज येथे काही प्रमाणात सांडपाण्याची शेती व आगाशी भागांत काही ठिकाणी उघडी गटारे यामुळेच या मच्छरांचा सूळसूळाट झाला आहे आणि या सर्व बाबीत वसई विरार महानगर पालिका पूर्ण पणे दुर्लक्ष करत आहे.
कोवीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतां नित्यनियमाने यावर ती औषध फवारणी वेळोवेळी करावी अशी मी मागणी सत्यमेव जयते ट्रस्ट सामाजिक संस्थेकडून वसई विरार नगरपालिके मध्ये करण्यात आली आहे.

