ट्रकमधील बॅटऱ्यांची चोरी
पनवेल दि.04 (संजय कदम)- उभ्या ट्रकमधील एक्साईड कंपनीच्या दोन बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीत घडली आहे. फारूख खान (वय-33) याने त्याच्या ताब्यातील ट्रक तळोजाऔद्योगिक वसाहतीतील टेक्नोव्हा कंपनीच्या गेटच्या बाजूला उभा करून ठेवला असताना अज्ञात चोरट्यांनी त्या ट्रकमधील एक्साईड कंपनीच्या दोन बॅटऱ्या ज्याची किंमत जवळपास 12 हजार आहे. या चोरून नेल्या आहेत. याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.