ऐन कोरोना लॉकडाऊन काळात माणगाव तालुक्यात रेशनिंग धान्याचा होत आहे काळाबाजार….जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे .
प्रतिनिधी/माणगाव : गेले सव्वा वर्ष जनता कोरोना लॉकडाऊन यांसारख्या गोष्टींचा सामना करत आहे.अश्यातच देशाचा आर्थिक कणा असलेल्या उद्योग वर्गासाहित,शेतकरी व मजूर लोकांची देखील आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अश्यातच शासन व प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब करत परिस्थिती आवाक्यात आणण्याच्या प्रयत्न करत आहे,जेणेकरून अश्या परिस्थितीत भूकबळी जाऊ नये.याकरिता फ्री रेशनिंग शासनाकडून नागरिकांना देण्यात आले आहे मात्र माणगांव तालुक्यातील चित्र वेगळेच दिसत आहे.या ठिकाणी दोन योजनेपैकी एक योजनेचे धान्य डायरेक्ट हडपण्याचे प्रकार समोर येत आहेत.
सविस्तर वृत्त असे की गेल्या मार्च महिन्यात केंद्राचे फ्री धान्य(PM). अधिक राज्यात रेग्युलर असनारे धान्य (CM) असे दोन्ही धान्य फ्री देण्यात आली मात्र काही दुकानदारांनी ह्यापैकी १च योजनेचे धान्य नागरिकांना वाटून बाकीचे लाटले,साखरेच्या बाबतीत ही तोच प्रकार आहे,या बाबतीत माणगाव तालुक्यातील ढाळघर लोणशी, गोरेगाव, बामणोली, निजामपूर विभागातील पाटणुस,शिरवली ,जिते,या गावतील दुकानदार अग्रेसर आहेत. बामणोली दुकानदार अग्रेसर आहे.हे लोक धान्यसाठा असून देखील लोकांना नसल्याचे भासवत आहेत व दोन्ही पैकी कुठल्या तरी एकच योजनेचे धान्य देऊन वाट मोकळी करत आहेत.
अश्या परिस्थितीत लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या व पदारी आलेले धान्य लाटणे म्हणजे, मयताच्या टाळूवरील लोणी खाणे ! असा प्रकार माणगांव तालुक्यात दिसून येत आहेत.यावर आळा घालण्याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड यांनी या माणगाव तालुक्यात घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
👍प्रतिक्रिया चौकट
माणगांव तालुक्यातील रेशन दुकांदारानकडून असे प्रकार घडत असतील तर ती नक्कीच खेदजनक बाब आहे,अश्या दुकानदराविरुद्ध तक्रार असल्यास तक्रारदार यांनी पुरवठा विभाग माणगांव तालुका यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज करावे..प्रशासन त्याचा योग्य/शहानिशा करून विचार करेल.
👉प्रमोद घोसाळकर, रायगड जिल्हाध्यक्ष रास्त भाव धान्य दुकानदार संघटना👈व
👉श्री शेखरशेठ देशमुख .जिल्हा उपाध्यक्ष रास्त भाव धान्य दुकानदार संघटना👈