उध्वस्त झालेल्या आदिवासी कुटुंबाना उरण सामजिक संस्थेतर्फे मदतीचा हाथ.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )
शासनाच्या खावटी योजने अंतर्गत बेलवाडी-सारडे, पूणाडे वाडी-पुनाडे , जांभूळपाडा वाडी-चिरले, जासईवाडी-जासई येथील कातकरी वाडी वर धान्य वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षक वर्गाने अगदी पद्धतशीर पने सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली. बेल वाडी,सारडे कातकरी वाडी वर सामाजिक कार्यकर्ते सचिन डाउर , सीमा घरत महिला प्रमुख उरण सामाजिक संस्था यांच्याकडून देखील धान्याचे वाटप करण्यात आले.रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे उरण तालुक्यातील सारडे बेलवाडी येथील चंदू नारायण वाघमारे ह्या आदिवासी महिलेचे घर कोसळून सर्व सांमानाची नासधूस झाल्याने ती अतिशय टेंशन मध्ये होती. परंतु उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आधार स्तंभ प्रा. राजेंद्र मढवी अणि संतोष पवार यांनी तिला समजावून सांगितले आणि तिला धीर दिला. प्रमोद ठाकूर यांनी तिला जसे हवे तसे घर बांधून देण्याची जबाबदारी घेतली. तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि गट विकास अधिकारी निलम गाडे यांच्या आदेशानुसार तलाठी जोशी तात्या आणि ग्रामसेविका यांनी स्वतःआदिवासी वाडी वर जावून पंचनामा करून पुढील कार्यवाही साठी तहसील कार्यालयात पाठवला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण वरून प्रकल्प अधिकारी यांच्या आदेशानुसार श्री भानुशाली यांचा फोन आला होता.ते स्वतः सदर घटनेची तपासणी करण्यासाठी येणार असून लवकरात लवकर सदर महिलेस घर बांधून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. बेल वाडी वरील सर्व कुटुंबांना भेटण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार , महिला प्रमुख सीमा घरत ,सुरक्षा रक्षकांचे कैवारी प्रमोद ठाकूर, तरुण कार्यकर्ता हर्ष पवार , खावटी योजनेचे उरण तालुका प्रमुख अप्पा सो मोरे , दत्ता पाटील,खंडू पिचड, मोकल, भैरू जाधव, सचिन माने आदी मान्यवर उपस्थित होते.

