पनवेल परिसरात आढळला मृतदेह
पनवेल दि.08 (संजय कदम): पनवेल शहर परिसरात एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 50 वर्षे, चेहरा गोल, बांधा मध्यम, डोक्याचे केस पांढरे, उंची 5 फूट 7 इंच, दाढी मिशी वाढलेली, अंगात पांढऱ्या रंगाचा टिशर्ट, ग्रे रंगाची लाईनिंग असलेली पॅंट व काळ्या रंगाचे बूट घातले आहेत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-02227452333 किंवा पोलिस उपनिरीक्षक गणेश कदम यांच्याशी संपर्क साधावा.