ग्रुप ग्रामपंचायत पारगावने केले 170 जणांचे मोफत लसीकरण
पनवेल, दि.9 (वार्ताहर)- तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पारगावने राज्य शासनाच्या नवीन धोरणाचा अवलंब करून परिसरातील 170 जणांचे मोफत लसीकरण केले असून यासाठी सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी शासनासह जिल्हा परिषदेकडे व आरोग्य खात्याकडे पाठपुरावा करून या लस उपलब्ध करून घेतल्या आहेत.
कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस परिसरातील ग्रामस्थांना देण्यात आला. सोशल डिस्टंसिंग पाळून मास्क लावून वय वर्षे 18 ते 45 वरील व्यक्तींना डोस देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने आधारकार्ड तापासण्यात आले व त्याची नोंदही करण्यात आली. याचा लाभ 170 जणांनी घेतला आहे. यासाठी सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी विशेष प्रयत्न केले व कोणताही भेदभाव न करता सरसकट सर्वांना लसीचे डोस देण्यासाठी प्रयत्न केला. याकामी त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाटील, उपसरपंच अंजली कांबळे, मा. उपसरपंच सुशील तारेकर, मा. उपसरपंच मनोज दळवी, सदस्या निशा पाटील, सुनंदा नाईक, बानुबाई म्हात्रे, सोनाली भोईर, शिल्पा नाईक, कल्पना तारेकर, सदस्य विश्वनाथ पाटील, विजय वाघे, डॉ. भारती आशा तारेकर, प्रमोद म्हात्रे, सोनाली देशमुख, चंद्रभागा तारेकर, देवळे आदींचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांचे कौतुक केले आहे.