जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने कलाकार बांधवांसाठी आर्थिक मदत.
उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )जाणीव सामाजिक संस्था यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला कलाकार बांधवांसाठी आर्थिक मदत करण्यात आली.
रंगभूमी संगीत कला मंच या कलाकारांच्या संस्थेला मदत करण्यात आली.खरंतर कोरोना महामारीमुळे जगभरात नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे.रंगभूमी बंद असल्या कारणाने कलाकार हताश आहेत, आज दीड वर्ष झाली कलाकार मंडळी कोरोना सोबत झुंजत आहेत.खरंतर समाजाचा कलाकारा कडे पाहण्याचा दृष्टिकोन गरीब म्हणून नाही मात्र दीड वर्षे रोजगाराशिवाय राहणं सोपं नाही. अशी प्रतिक्रिया पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा जाणीव संस्थेचे अध्यक्ष राजेश केणी यांनी दिली. सदर मदत ही अगदी छोटी आहे मात्र आमच्या परीने समाजासाठी काहीतरी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं समाधान निश्चित असल्याची भावना राजेश केणी यांनी व्यक्त केली.
या वेळेस जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, माजी उपसभापती राजेश केणी, खजिनदार संदीप यादव, जाणीव चे सदस्य तथा पनवेल पंचायत समिती सदस्य स्वप्नीलजी भुजंग, अनिलजी उलवेकर आदी मंडळी उपस्थित होते.
कलाकाराच्या वतीने प्रसिद्ध कवी एकनाथ माळी यांनी जाणीवच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या खास शैलीत जाणीव च्या कार्यावर एक सुंदर गाणं तयार करण्याचा शब्द एकनाथ माळी यांनी दिला.