श्री साई बाबा मंदिर येथे श्री रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून विविध आध्यामिक कार्यक्रम संपन्न
पनवेल दि,10 (संजय कदम): परमपुज्य सदगुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आर्शिवादाने पनवेल येथील श्री साई बाबा मंदिर येथे आज श्री रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून विविध आध्यामिक कार्यक्रम संपन्न झाले .
त्यानिमित्त प्रथमच श्री रामकथा (श्री रामचरित्र मानस पाठ) चे आयोजन करण्यात आले होते सदर श्री रामकथा पुज्य श्री दिव्यांशु महाराज -अयोध्या व त्यांच्या सहकार्यांनी सादर केली . या निमीत्ताने आज पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ . कविता चौतमोल व पत्रकार संजय कदम यांच्या हस्ते उपस्थित पंडितांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच आज सकाळ पासूनच १४० विधवा माता भगिनींना महिन्याचे राशन व ११० पंडितांना भोजन देण्यात आले . पहाटे यज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई नारायण बाबा आश्रमव श्री भगवती साई संस्थान(रजि.)पनवेल चे चेअरमन खेमचंद गोपलानी, को-ऑडरीनेटर रामथदानी व सचिव रामलाल चौधरी यांनी दिली . हजारो भाविकांनी श्री साई बाबांचे व श्री साई नारायण बाबा चे आर्शिवाद घेतले .
कोट – साई मंदिरात येऊन सर्वांचे दुःख, विवंचना नष्ट होतात वेळोवेळी येथील प्रत्येक कार्यक्रमांत मला सहभागी होता येते हे मी माझे भाग्य समजते आज ही येथील संस्थेचे पदाधिकारी व साई सेवक नि स्वार्थी पणे येथे येणाऱ्या प्रत्येकाची सेवा करतात – महापौर डॉ . कविता चौतमोल
फोटो : महापौर डॉ . कविता चौतमोल व पत्रकार संजय कदम यांच्या हस्ते उपस्थित पंडितांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना