मंगळसूत्र खेचून चोरट्यांचे पलायन:महिलांमध्ये भीतीचे वातावरण
पनवेल दि,२०(वार्ताहर): खारघर मध्ये सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या साठ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी खेचून चोरट्यांनी पळ काढल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
खारघर सेक्टर-१८ मध्ये राहणाऱ्या शोभा प्रेमराज राऊत (वय ६०) या नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर खारघर सेक्टर १८ मधील मैदान आणि माऊली सोसायटी लगतच्या रस्त्यावर समोरुन आलेल्या महिलेशी संवाद साधत असताना मोटाररुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी खेचून पळ काढल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः सकाळी पोलिसांची गस्त नसते. तसेच रस्त्यावर वर्दळ कमी असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत.
या चोरी प्रकरणी शोभा राऊत यांनी खारघर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही मधील फुटेज घेवून तपास सुरु केला आहे.
आयशरचे पनवेल आणि वसईमध्ये दोन नवीन डीलरशिपचे उद्घाटन एव्ही मोटर्सचा मुंबई आणि महाराष्ट्रात विस्तार

