संदीप म्हात्रे यांचा युवकांमधील वाढता प्रभाव उल्लेखनीय
प्रतिनिधी / श्री.संतोष आमले .
यापूर्वी पनवेल शहर जिल्हा कार्यकारिणीच्या मुख्य बॉडीत काम करत असल्यामुळे युवकांचा विरळच संबंध येत होता. परंतु गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पार्थ पवार फाउंडेशन च्या माध्यमातून होणारी जन सहकार्याची कामे व त्यासाठी करावा लागणारा जनसंपर्क यानिमित्ताने श्री संदीप म्हात्रे श्री सुनील ढेंबरे, श्री दर्शन ठाकूर, मंगेश नेरुळकर व अन्य युवा कार्यकर्त्यांचा संपर्क आला.
संदीप म्हात्रे व त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम व निडर वृत्ती पाहून खरंच समाधान वाटले. संदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारणी व पनवेल विधानसभा युवक मध्ये अमुलाग्र बदल होत आहे. पूर्वी ग्रामीण विभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असलेली कमजोरी व कार्यकर्त्यांचा अभाव संपुष्टात आणून नवोदित पदाधिकाऱ्यांना जिल्हा युवा व विधानसभा युवा कार्यकारिणीत स्थान देत. मागील काही दिवसांमध्ये सतीश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली व दर्शन ठाकूर यांच्या सहकार्याने जवळजवळ सहाशे युवकांचे झालेले प्रवेश हे प्रत्यक्ष दर्शनी प्रवेश कार्यक्रमात व प्रक्रियेत हजर राहून मला अनुभवता आले.
तळोजा शहर येथे झालेल्या काेराेना जनजागरण व कार्यकर्ता प्रवेश शिबिरामध्ये संदीप म्हात्रे यांनी उच्चारलेले एक वाक्य नेहमी माझ्या लक्षात राहील की मी फार मोठे “भाषण” देऊ शकणार नाही परंतु लोकांना अडचणीच्या काळात “राशन” देण्याची व्यवस्था करण्याची धमक माझ्यात आहे, यातून त्यांच्या बोलण्यापेक्षा काम करण्याच्या वृत्तीचा अनुभव येतो.
मनमिळावूपणा, रोखठोक वागणे व सर्वांना समानतेची वागणूक यामुळे पनवेल शहर व ग्रामीण विभागामध्ये युवकांचे आकर्षण बिंदू ते ठरत आहेत.
गणपती दर्शनाच्या निमित्त पनवेल शहर व ग्रामीण विभागात युवकांसोबत जाण्याचा योग आला. सदर दौऱ्यामध्ये युवकांची मोठी फळी त्यांच्याबरोबर होती विशेष करून मंगेश नेरूळकर, महेश पाटील, प्रभाकर फडके, अनुराग गायकवाड ,विकास पाटील, बजरंग म्हात्रे ,शशिकांत करंजुले यांच्यासारखे प्रभावी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबर या जनसंपर्क मध्ये हिरीरीने सहभागी झाले. प्रत्येक आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये त्यांना व त्यांच्या बरोबर असणारे युवक कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान व संदीप म्हात्रे यांच्या कडून सर्वांना मिळणारी आपुलकीची वागणूक अनुभवता आली. प्रत्येक घरांमध्ये युवकांशी सुसंवाद व वरिष्ठांचा सन्मान यातून त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाचे दर्शन होते याशिवाय तोच गुण त्यांचे नेतृत्व क्षमतेला बळ देतो असे मला वाटते.अथक परिश्रमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवापिढी पनवेलमध्ये घडवण्याचा त्यांचा मानस खरोखरच शून्यातून स्वराज्य घडवण्या सारखा आहे, या त्यांच्या कार्याला माझ्याकडून नेहमी शुभेच्छा राहतील व उत्तरोत्तर समाजासाठी यांच्या हातून चांगले कार्य व्हावे अशी सदिच्छा ,श्री.प्रसाद सुभाष ढगेपाटील
सहसचिव पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी दिल्या.