पनवेल महापालिकेने कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या बाबतीत राजकारण करून परीक्षा घेऊ नये : रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक.
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्याना टंकलेखन कर्मचाऱ्यांना टंकलेखन येत नाही व संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाला अपेक्षित काम होत नसल्याचे पनवेल महानगरपालिका आयुक्त म्हणून आपण कबुली दिली आहे व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय पनवेल महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. मात्र याआधी देखील पनवेल महानगरपालिका मार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अशाप्रकारच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, मात्र त्याचा कोणताही निकाल व त्याचे परिणाम आजपर्यंत दिसून आलेले नाहीत. प्रथम पनवेल महापालिका आयुक्त म्हणून या परीक्षेचे नेमके काय झाले व हि परीक्षा घेण्याचा उद्देश काय होता याची माहिती पनवेलच्या जनतेला द्यावी. कोरोना काळामध्ये पनवेल महानगरपालिका कामगारांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून काम केले आहे. पनवेल महापालिका आयुक्तांनी परीक्षेला मान्यता दिली आहे मात्र याआधी देखील काहीवेळा राजकारण करून परीक्षा घेतल्यानंतर आपल्या मर्जीतल्या काही गावाकडील उमेदवार या ठिकाणी काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सध्याच्या परीक्षा भरतीवर देखिल संशय निर्माण होत आहे. जे जुनी लोक आहेत त्यांचे कोणत्याही पद्धतीने परीक्षा घेण्यात येऊ नये तसेच कोणत्याही कंत्राटी कामगारांची परीक्षा घेऊन त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये. महापालिकेला जर का परीक्षा घ्यायची असेल तर नव्याने भरती करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची परीक्षा घेऊनच त्यांची भरती करावी व परीक्षा घेण्याचा निर्णय बदलावा व पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी पत्राद्वारे प्रशासनाला केली आहे.