गरजेपोटी बांधलेली घरे होणार कायम.. प्रकल्पग्रस्तांचा मोठा विजय
आज दिनांक १८/०९/२०२० रोजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजीसाहेब ठाकरे ह्यांच्या सुचनेप्रमाणे नगरविकास मंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब* ह्यांच्यासोबत मंत्रालयाच्या सातव्या माळ्यावर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत बैठक पार पडली.
*प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे*
१) आता असलेल्याच जागी गरजेपोटी बांधलेली प्रकलपग्रस्तांची घर कायम करणे.
२) पनवेल व उरण मधे कायमस्वरूपी इस्पितळ उभारली जाणार असून. कोविडसाठी ५००-५०० खाटांची इस्पितळ ताबडतोब चालू करण्यात येणार आहेत.
३) पंतप्रधान आवास योजनेची घरकुल योजना रेल्वेस्टेशन जवळील जागेत होत आहे. त्या जागेची पाहणी करून लोकांच्या असलेल्या विरोधाबद्दल निर्णय घेण्यात येईल.
४) नैना प्रकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली असून. ह्यात नैना प्रकल्प व विरार-अलिबाग कॉरिडॉर बद्दलही पुढच्या आठवड्यात बैठक पार पडणार आहे.
५) ग्रामपंचायतीतील विलीनिकरणानंतर महापालिकेत कामास असणारे कामगार कायम करण्याबाबत हि ह्या मिटिंगमधे चर्चा झाली असून त्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.
६) उद्या पनवेल आणि उरण येथे कोविड इस्पितळ त्वरित चालू करण्याबाबत सिडको अधिकारी व प्रकल्पग्रस्त समिती पाहणी करणार आहे.
७) कोविडसाठी लागणाऱ्या कार्डिॲक ॲंब्युलंस पनवेल महापालिकेला तातडीने देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे.
*या मिटिंगनंतर सर्व प्रकल्पग्रस्त समितीच्या नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते श्री. बबनदादा पाटिल ह्यांचे हि बैठक घडवून आणल्याबद्दल आभार मानले.*
यावेळी सिडकोचे एम.डी. डॉ. संजयजी मुखर्जी, जॉइंट एम.डी. कैलास शिंदे, जॉइंट एम. डी. मदगुर व त्यांचे अधिकारी उपस्थित होते.
ह्यावेळी ह्या बैठकीसाठी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत चर्चेसाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते आमदार श्री. बाळाराम पाटिल, मा. आमदार व जिल्हाप्रमुख श्री. मनोहर भोईर, कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. आर सी घरत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. शिरिष घरत, राष्ट्रवादीचे चिटणीस श्री. प्रशांत पाटील, सचिव श्री. सुदाम पाटील, श्री. संतोष पवार, ९५ गाव समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, ॲड. मदन गोवारी, नवी मुंबई श्री. दशरथ पाटील, शेकाप चिटणीस श्री. गणेश कडू, कॉंग्रेस सरचिटणीस श्री. त्रिंब्यक केणी, ॲड. निलेश पाटील, नैना संघटनेचे अध्यक्ष श्री. वामन पाटील, नगरसेवक श्री. रवी भगत तसेच इतर प्रकल्पग्रस्तांचे नेते उपस्थित होते.
*वंदनीय दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त समिती, पनवेल-उरण*