- नगरसेवक विक्रांत पाटील यांनी ड्रेनेज लाईनची समस्या काढली निकाली
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शहरातील चिंतामणी हॉल समोरच्या ड्रेनेज लाईनचा विषय हा बरेच दिवस प्रलंबित होता. रस्त्याचे काम करतांना दाबला गेला होता, चेंबर चा शोध घेऊन ड्रेनेज लाईनशी जोडण्यात आला. यासाठी प्रभागातील नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सातत्याने महानगरपालिकाकडे सतत पाठपुरावा करून आज प्रत्यक्ष काम उभे राहून करून घेतले.
शिवमंदिर समोर काही खड्डे पडले आहेत आणि ड्रेनेज चेंबरच्या बाजू ने खड्डा पडला आहे त्याची पाहणी स्थानिक नगरसेवक विक्रांत पाटील यांनी करून या संबंधी पनवेल महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांना बोलावून काम करून घेतले व खड्डे बुजविण्यास सांगितले. त्यामुळे प्रभागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
फोटो ः नगरसेवक विक्रांत पाटील प्रत्यक्ष काम करून घेताना.