28 वर्षीय तरूण बेपत्ता, हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पनवेल दि. 20 (वार्ताहर)- एक 28 वर्षीय तरूण कोणास काही न सांगता कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मोहोम्मद नवी हसन (रा.-पॅराडाईस कंपनी, साई वर्ल्ड सिटी बांधकाम साईट, पळस्पे फाटा) उंची साधारण साडे 5 फूट, रंग सावळा, डोळे काळे, डोक्याचे केस काळे, नाक सरळ, अंगाने मध्यम, चेहरा उभट, कपाळ मोठे असून त्याला हिंदी भाषा अवगत आहे. तसेच त्याच्या अंगात काळ्या रंगाचा हाफ टीशर्ट व त्यावर पांढऱ्या रंगाची लाईन व निळ्या रंगाची जीन्स पॅंट घातली आहे. तसेच पायात खाकी रंगाची चप्पल आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 किंवा पोलिस नाईक यु.बी. पाटील यांच्याशी संपर्क साधावा.