- महेंद्र मोतीलाल बांठीया यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त परमशांतीधाम वृद्धाश्रम येथे अन्नदान
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः पनवेलमधील एक सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे तळागळातील लोकांना नेहमी मदतीचा हात पुढे करणारे व यशस्वी उद्योजक कै.महेंद्र मोतीलाल बांठीया यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुुटुंबियांनी व मित्र परिवाराने परमशांतीधाम वृद्धाश्रम खोपोली येथे जावून तेथे वास्तव्य करणार्या वृद्धांना अन्नदान केले.
यावेळी राजू परमार, श्रेणिक कटारिया, महेंद्र पुरोहित, अमोल गोंधळी, राजेंद्र बोहरा, अनुज बांठीया, सोनु बांठीया, आकाश बांठीया व इतर मित्र परिवार यांनी आज सकाळी परमशांतीधाम वृद्धाश्रम येथे जावून तेथे असलेल्या वृद्धांशी गप्पा मारल्या, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना अन्नदान केले. यापुढे सुद्धा वेळोवेळी या कुटुंबियांसाठी मदत केली जाईल असे बांठीया कुटुंबियांनी सांगितले. - महेंद्र मोतीलाल बांठीया यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त परमशांतीधाम वृद्धाश्रम येथे अन्नदान करताना राजू परमार, श्रेणिक कटारिया, महेंद्र पुरोहित, अमोल गोंधळी, राजेंद्र बोहरा, अनुज बांठीया, सोनु बांठीया, आकाश बांठीया व इतर मित्र परिवार