डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांचा ’स्नेहकुंज आधारगृहा’ला मदतीचा हात
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः ज्या समाजातून आपण मोठे झालो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनात असणारी माणसेच समाजाला तारतात. अशी माणसे समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करतात. माझ्या घासातला अर्धा घास मी ज्याला खरोखर गरज आहे त्याला देणार, ही खरी भावना, ही खरी संस्कृती. अश्या भावनेतूनच कार्य करणारे ’लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय सोनवणे यांनी स्नेहकुंज आधारगृहाला मदतीचा हात देवून समाजासाठी एक उत्तम उदाहरण दिले आहे.
समाजात महापुराचे संकट असो किंवा भूक मारीचे ’लोकशक्ती संजीवनी’ संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यामध्ये सर्वजण नेहमीच इतरांच्या पुढे असतात. कोरोना संपतोय असे आपण म्हटले तरी रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. या काळात वृद्धांचे आरोग्य, मानसिकता, आहार या सर्व गोष्टी सांभाळायचे एक मोठे आव्हान होते. अश्यावेळी डॉ.संजय सोनावणे यांसारख्या योद्ध्यांनी मोलाचे सहकार्य केले. आज त्यांनी ’स्नेहकुंज आधारगृहा’ला जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी रु.5000/- अर्थसहाय्य केले. याबद्दल संस्थेने त्यांचे आभार मानले आहेत.