दौलावडगाव परिसरात अतिवृष्टी
पिकांचे आतोनात नुसकान
ढगफुटीचा प्रकार झाल्याने शेतात पाणीच पाणी
पंचनाम्याची माजी.जि.प.सदस्य सुखदेव खाकाळ यांवी मागणी
बीड / दि.२३ अंभोरा( प्रतिनिधी) बाळासाहेब रकटाटे—-
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरामध्ये काल रात्री झालेल्या ढगफुटीच्या प्रकाराने पिकांच्या आतोनात नुसकान झाले असून शेतात पाणी साचले आहे .झालेल्या पिकांची त्वरीत पंचनामा करावा ची मागणी माजी जिल्हा पारिषद सदस्य सुखदेव खाकाळ यांनी केली आहे .
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव अंबनोरा सालेवडगाव आंबेवाडी कारखेल म्हसोबवाडी दौलावडगाव हिवरा पिंपरखेड सुलेमान देवळा खुंटेफळ बालेवाडी पुंडी कारखेल नांदूर परिसरामध्ये या परिसरात काल संध्याकाळच्या वेळेस पावसाने रौद्र रुप धारण केले .या परिसरात ढगफुटी होऊन अतिव्रष्टी झाली. या या अगोदरही या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस होता. मात्र काल या परिसरामध्ये अतिवृष्टीतून ढगफुटीचा प्रकार झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतातील माती वाहून गेली. शेतामध्ये उभे पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकर्याचे नुसकान झाले आहे .यामध्ये सोयाबीन तूर कापूस कांदा उडीद या पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे हाती तोंडाशी आलेला पिकांचा घास शेतकऱ्यांचा या निसर्गाने हिरावून नेला आहे .शेतांमध्ये गुडघे इतके पाण साचल्यामुळे ही पिके करपून जाणार असून शेतकऱयांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे
त्यामुळे प्रशासनाने या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी दोलावडगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव खाकाळ यांनी केली आहे. .