- जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी मराठा समाजाचे धरणे आंदोलन
पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने मराठा समाज पुन्हा एकवटला असून शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज रायगड तर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आरक्षणासाठी मराठा समाजानी आंदोलनाचा धङाका लावला होता. 2018 मध्ये महाराष्ट्रभर क्रांतीदिनी झालेल्या आंदोलनानंतर तत्कालीन सरकारला आरक्षणावर शिक्कामोर्तब करावे लागले होते. परंतु नुकतीच सुप्रीम कोर्टानी आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यातच राज्य सरकारने पोलिस भरती ची घोषणा करुन मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे.संतापलेला मराठा समाजाकङून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालय समोर 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विनोद साबळे यांनी दिली.
