नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाची राज्य स्तरीय बैठक संपन्न झाली. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत मंजूर झालेले 25 ठराव…
वार्ताहर /: नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाची राज्य स्तरीय बैठक संपन्न झाली. बैठकीला छत्रपती संभाजी राजे , छत्रपती उदयन राजे महाराजांचे भाचे पाटील , राजेंद्र कोंढरे , वीरेंद्र पवार , विनोद साबळे , अंकुश कदम , सुनील बागुल ,करण गायकर , तुषार जगताप , दिलीप पाटील , सचिन तोडकर , प्रवीण पिसाल मंदार जाधव , पंकज घाग , प्रमोद जाधव , तेजस पवार , नीलेश देशमुख , राजेंद्र दाते पाटील , प्रोफेसर तांबे सर , सुप्रीम कोर्टातील आपले वकील श्रीराम पिंगले , राजन परब , नाना पार्सेकर , किरण सावंत प्रवीण पाटील , जगन्नाथ काकड़े ,प्रकाश देशमुख , राजन घाग , युवराज सूर्यवंशी , अभिजीत घाग , तसेच 30 जिल्ह्यातील प्रमुख 100 समन्वयक उपस्थित होते 1. इडब्लूएसमध्ये आरक्षण नको.
*2. प्रत्येक ग्रामपंचायतमार्फत मराठा क्रांती मोर्चाने अधिकृतरित्या दिलेले निवेदन जिल्हाधिकारी (शासन) यांना द्यावे.*
3. येत्या 2 ऑक्टोबरला खासदार, आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणे.
4. मराठा क्रांती मोर्चातील तरुणांवर दाखल असलेले सर्व गुन्हे सरकसकट मागे घेणे.
5. सन 2019 मध्ये एमपीएससीमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करणे.
6. अतिवृष्टीमुळे फळबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टरी 1 लाख व इतर पिकांसाठी 60 हजार रूपये भरपाई.
7. केंद्र सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा.
*8. येत्या 5 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील प्रत्येक तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे.*
9. सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी राजे यांची नियुक्ती करावी. सारथीला एक हजार कोटीचा निधी द्यावा.
10. राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठा समाजासाठी 12 टक्के जागा वाढवून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी.
*11. सर्व स्तरातून येणाऱ्या निवेदनाचा मसूदा एकसारखा असावा.*
12. प्रत्येक विषयासाठी अभ्यास तज्ज्ञांची विषयानुरूप वेगवेगळी समिती स्थापन करावी.
13. राज्य शासनाने राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे एसइबीसी प्रवर्ग 102 घटनादुरूस्तीनुसार नोटीफाय करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा.
14. राज्य शासनाने केंद्र शासनाला राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करून 50 टक्क्यांची मर्यादा रद्द/ संपविण्यासाठी करण्यासाठी विनंती प्रस्ताव पाठवावा.
15. राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत वाढीव जागांची तरतूद(सुपर न्युमररी) करून आर्थिक तरतूद करावी.
16. सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणाऱ्या जेष्ठ वकीलांना ब्रिफींग करण्यासाठी सुचवलेल्या वकीलांची समिती तात्काळ गठीत करण्यात यावी.
17. आरक्षणाचा प्रश्न घटना दुरूस्तीमुळे सुटणार असल्याने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी दिल्लीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजीत केला पाहीजे.
18.ज्या योजनांबाबत सरकारने घोषणा केल्या आहेत.त्यांची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहीजे..
19. आठ ते दहा लोकांची समिती नियुक्त करून त्या समितीलाच शासन प्रशासनाशी चर्चा करण्याचे अधिकार द्यावेत..
20. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत,आंदोलनाबाबत माध्यमांना माहीती देण्यासाठी अधिकृत अभ्यासू प्रवक्ते नियुक्त करावेत..त्यांनीच माध्यमांशी संवाद करावा.
21. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी.
*22. भविष्यातील कुठलेही आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे.मराठा क्रांती मोर्चाची परंपरा कायम राखावी.*
*23. कुठल्याही मागास वर्ग समाजाच्या विरोधात क्रांती मोर्चा जाणार नाही.*
24. आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयीन लढ्यात सरकारची पर्यायाने समाजाची बाजू मांडण्यास अपयशी ठरलेले महाअधिवक्ता कुंभकोणी यांचे अधिकार काढून घ्यावेत.
25. महाराष्ट्रात 10 आॕक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाशी महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नाही