उपमहानगरप्रमुश दिपक घरत यांना पितृशोक
पनवेल दि.27 (वार्ताहर)- शिवसेना उपमहानगरप्रमुश दिपक घरत यांचे पिताश्री कै. मंगलदास गोपाळ घरत यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षी अल्पशः आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अरूण घरत, अशोक घरत, दिपक घरत, मुलगी करूणा पाटील, सुरेखा म्हात्रे, विद्या म्हात्रे, नातवंडे, सुना, जावई असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी गुरूवार दि. 01.10.2020 रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे तर उत्तरकार्य (तेराव) शुक्रवार दि. 02.10.2020 रोजी बेलपाडा, खारघर येथील राहत्या घरी सकाळी 11 वाजता होणार आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने संसर्ग टाळण्यासाठी दशक्रिया विधी व उत्तरकार्य कमीत कमी माणसांद्वारे करण्याचे घरत कुटूंबियांनी ठरविले आहे. तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन घरत कुटूंबियांतर्फे करण्यात आले.