कु. अरमान बशीर कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त टावरवाडीतील नागरिकांना अन्नदान . कुरेशी कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम.
पनवेल / केवल महाडिक : कोरोनाच्या व लॉकडाऊन संकटकाळात हातावर पोट असलेल्या नागरिकांना एक वेळचे जेवण मिळणेही मुश्कील झाले आहे. महाराष्ट्र शिव कामगार सेनेचे चिटणीस व आशा किरण फाउंडेशन व आशा मसालेचे संस्थापक बशीरभाई कुरेशी यांचा मुलगा अरमान कुरेशी याचा मंगळवारी वाढदिवस होता. या वेळी दरवर्षीप्रमाणे धूमधडाक्यात वाढदिवस साजरा न करता परिसरातील व विशेषतः आदिवासी वाडी व पाड्यातील लोक हे एक वेळच्या अन्नासाठी बाहेर फिरत आहेत. अशा लोकांना अन्नदान करण्याचे बशीरभाई कुरेशी यांनी ठरवले व त्याप्रमाणे त्यांनी 200च्या वर लोकांना आपल्या फार्महाऊस येथे अन्नदान करून अरमानचा वाढदिवस साजरा केला. या वर्षी कोणताही बडेजावपणा न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अरमानचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला व अरमानच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या अन्नदान कार्यक्रमामुळे आत्मीय समाधान लाभले असे बशीरभाई कुरेशी यांनी सांगितले. यावेळी अरमान कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त कुरेशी कुटुंबीयांनी त्याला शुभाशीर्वाद दिले.