सारडे ग्रामपंचायत परिसरातील होणारी विकास कामे स्थानिक भूमीपुत्रांना देण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः सारडे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात नवनवीन कंटेनर यार्ड गोदाम उभारण्यात येत आहेत. सदर विकास कामे करण्यासाठी बाहेरील कंत्राटदार कामे घेत असून स्थानिक भूमीपुत्रांना या कामापासून दूर ठेवण्यात येत आहे. तरी सदर कामे ही स्थानिक भूमीपुत्रांनाच द्यावी अशी मागणी या विभागातील शिवसेनेने तेथील कंटेनर मालकांना, यार्ड मालकांना केली आहे.
सारडे ग्रामपंचायत आता कंटेनर नव नवीन कंटेनर यार्ड, गोडाऊन सुरू झाली आहेत, झाडाझुडुपात असलेल्या ह्या गावात बाहेरील उद्योजक जमिनी विकत घेऊन भराव करून, झाडे तोडून आता गोडाऊन बांधत आहेत, सारडे गावाच्या हद्दीतील ही जागा रामदेव पांडे यांनी विकत घेतलेली आणि त्यांनी ही जागा लीज वर दिली आहे. त्या जागेवर स्थानिक कॉन्ट्रॅक्टर ला डावलून बाहेरील कॉन्ट्रक्टरांना काम देणे सुरू केले आहे. म्हणजेच शासनाने काढलेल्या नियमांना डावलून जसे की कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये स्थानिक कॉन्ट्रॅक्टर स्थानिक कामगार, स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे. हा प्रोजेक्ट करताना पर्यावरणाचा र्हास असो अथवा इतर कोणतेही कारण असो त्याकडे ह्या ठेकेदारांनी कानाडोळा केला आहे.
ह्याच प्रश्नांची विचारणा करण्याकरिता, इथल्या शेतकरी व ग्रामस्थानचि पूर्वपार वहिवाट, नैसर्गिक पाणलोट, कंपनीतील सांडपाणी ह्या बाबत काय नियम पाळणार तसेच होणार्या कंपनीत ग्रामस्थांना रोजगार व इतर कामे काय मिळणार ह्या सर्व बाबतीत विचारणा करण्याकरिता शिवसेना सारडे शाखेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले.
सध्या या जागेतून येणार्या मोठ्या गाड्यां, डंपर, क्रेन यांच्या रहदारी मूळे रस्त्यावर चिखल पसरला असून तिथे स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिकांना आपली वाहने हळू करून न्यावी लागत आहेत, चिखलाचे तुकडे रस्त्यावर पडले असल्याने मोटारसायकल वरून जाणार्या प्रवाशांचा कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे. कंपनीच्या ह्या बेकायदेशीर व मनमानी कामामुळे सारडे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरत असून ह्याच मुद्द्यांवर सारडे शिवसेनेच्या वतीने प्रशासनाकडे तक्रार केली आहे तसेच ह्या उपक्रमात स्थानिकांना काम मिळविण्यासाठी उग्र आंदोलन करण्यात येईल असे जाहीर केले आहे !!