- शांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप
पनवेल,
दि.30 (वार्ताहर)- नेरे येथील कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन या संस्थेतील आरोग्य विभागाला सर्जिकल साहित्याची गरज होती. तसेच राजीव-रजन आधारघर, रामकृष्ण निकेतन,मुख्य कार्यालय, सतरंजी विभाग, कुष्ठरुग्ण महिला व पुरुष वॉर्ड विभाग, दवाखाना, शांतिवन ग्राहक भांडार, स्नेहलता निसर्गोपचार विभाग, बलवंतराय मेहता सेंटर आणि अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे आदिवासी आश्रमशाळा अशा सर्व विभागाना अत्यंत गरज असलेले सॅनिटायझरची सुध्दा गरज होती. म्हणून सर्जिकल साहित्य व सॅनिटायझर इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे हँगिग गार्डन यांनी देणगी स्वरुपात दिले होते
सदर कार्यक्रमप्रसंगी सर्व विभागातील प्रमुखांना बोलविण्यात आले होते. यावेळी आरोग्य विभागासाठी सर्जिकल साहित्य व इतर विभाग प्रमुखांना सॅनिटायझरचे वाटप संस्थेच्या अध्यक्षा रक्षा मेहता यांच्या हस्ते आणि संस्थेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. आरोग्य विभागाचे प्रमुख व संस्थेचे कोषाध्यक्ष उदय ठकार यांनी आभार मानले.