परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी स्वीकारला पदभार
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्तपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
तत्पूर्वी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी शिवराज पाटील यांची वर्णी करण्यात आली आहे. पनवेल येथील परिमंडळ 2 च्या कार्यालयात शिवराज पाटील यांनी येवून पदभार स्वीकारला आहे. यावेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.