भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची ची विस्तृत बैठक इ-व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
पनवेल / वार्ताहर: भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची ची विस्तृत बैठक इ-व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून सन्मा. प्रभारी मा.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडली.
आतापर्यंतची भाजयुमो ची वाटचाल,सेवा सप्ताह कार्यक्रम आढावा,तसेच पुढील काळातील अपेक्षित वाटचाल याविषयी विशेष चर्चा करण्यात आली.
यावेळी सन्माननीय प्रभारी चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी युवा मोर्चाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.
सन्मा.प्रभारी श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी बैठकीला मार्गदर्शन केल्याबद्दल भाजयुमो प्रदेशाध्यक्ष श्री विक्रांतजी पाटिल यांनी आभार मानले.