कामोठे पोलीस ठाणे यांच्यामार्फत नियम मोडणाऱ्या दुकानांवर व व्यक्तींवर दंडात्मक कारवाई, कामोठे पोलीस ठाणे पोलीस अधिकारी यांचे मानले आभार
कामोठे / वार्ताहर : पनवेल महानगर पालिका हद्दीत कोरोना विषाणू साथीचा आजार कोविड १९ दिवसेंदिवस फैलावत चालला असून रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. पनवेल महानगर पालिका व संबंधित पोलीस ठाणे यांच्यामार्फत नियम मोडणाऱ्या दुकानांवर व व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. मात्र नुकतेच कामोठे येथे कामोठे पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूच्या रस्त्यावर मेघना वाईन्ससमोर ह्युंदाई इऑन या चारचाकीमध्ये संपूर्ण गाडी भरून गुटखा, तंबाखू या पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती
क्रांतीज्योत महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा व पत्रकार रुपालीताई शिंदे यांना कामोठे येथे राहणाऱ्या महिलांनी दिली त्यानुसार रुपालीताई शिंदे यांनी याठिकाणी जाऊन पाहणी केला असता याठिकाणी दोन इसम खुलेआम गुटखाविक्री करीत असल्याचे आढळून आल्यानंतर तात्काळ रुपाली शिंदे यांनी याची व्हिडीओ शूटिंग पत्रकारांकडून करून घेऊन कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटून याप्रकरणाची माहिती दिली व सत्यता दाखवली. यावेळी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दखल घेऊन सदर गुटखाविक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या मार्फत देण्यात आलेल्या तक्रारी अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे हुंडाई युवान गाडी क्रमांक एमएच 6450 86 या चार चाकी गाडीत खुलेआम गुटखा विक्री करणार्या इसमावर कामोठे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 36 2020 भादवि कलम 188 270 271 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायम सन 2005 चे कलम 51 कलम तीन प्रमाणे गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हा मध्ये ह्यामध्ये एम एच 46ही गाडी जप्त करण्यात आली आहे सबब तक्रारी अर्ज दप्तरी फाईल करण्यात आला आहे.असे पत्र कोमोठे पोलीस स्टेशन मधून मिळाले.आपण आमच्या तक्रारी अर्जावर केलेल्या तात्काळ कारवाई मुळे आपले खूप खूप धन्यवाद.आपण असेच सहकार्य करावे.