पनवेल महानगरपालिकेच्या वाहनचालकांसह इतर कामगार बांधवांना तातडीने बोनस देण्याची आझाद कामगार संघटनेची मागणी
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेच्या वाहनचालक, अतिक्रमण, डाटा एन्ट्री, इंजनियर बहुउद्देशिय सर्वेयर, स्टेंनो, स्वच्छता निरीक्षक, ड्राप्समन, फायरमन कर्मचार्याना तातडीने बोनस द्या अशी मागणी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी आज पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात महादेव वाघमारे यांनी म्हटले आहे की, पनवेल महापालिका ठेकेदार साई गणेश इंटरप्रायझेस अंतर्गत काम करणार्या अतिक्रमण विभागाच्या कामगारांना 10 दिवसात बोनस देण्यात यावा, प्रत्येक महिन्याच्या बिलामध्ये पनवेल महानगरपालिकेने ठेकेदार साई गणेश इंटरप्रायझेसला कामगारांचे बोनसचे पैसे अदा केले आहेत. तरी महानगरपालिकेकडून सदर कामगारांचा बोनस येत्या 10 दिवसात कामगारांना द्यावा अशी सूचना ठेकेदार साई गणेश एंटरप्रायझेसला द्यावेत अशी मागणी सुद्धा महादेव वाघमारे यांनी केली आहे.