मुलाला का मारतो विचारणा केल्यावरुन वडिलांसह कुटुंबाला केली मारहाण
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः माझ्या मुलाला का मारतो अशी विचारणा करण्यास गेलेल्या वडिलांसह त्याच्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना पनवेल शहरातील नवनाथ झोपडपट्टी येथे घडली आहे.
नवनाथ झोपडपट्टी येथे राहणारे विलास इंगवले यांचा मुलगा संतोष विलास इंगवले (16) हा सोड्याची बाटली घेवून घरी परतत असताना आरोपी सुरज गोविंद वाघमारे उर्फ बाबू (26) सह काळू व इतर साथीदार यांनी त्याला अडवून त्याच्याकडून बाटली हिसकावण्याचा प्रयत्न केला व त्याला चापट मारली. यावेळी त्याचे वडील विलास इंगवले हे विचारणा करण्यास गेले असता आरोपींनी त्यांना लाकडी पट्ट्याला लोखंडी खिळे असलेल्या वस्तूने विलास इंगवले, त्यांची मुलगी सविता शिंदे (23) व संतोष यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या घरावर फरश्याचे तुकडे फेकले. यात हे तिघे जखमी झाले असून या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.